मित्रांसाठी काय पण
मित्रांसाठी काय पण
छोटी पिटुकली रंगीत रंगीत
बाबा, सायकल हवी मला
खूप रडलो रुसून बसलो
बसलो नाही जेवायला
रडलो रडलो रडुनी झोपलो
स्वप्नी बघितले सायकलला
आईबाबांनी विचार केला
अंगणी सायकल दिसली मला
खुशीखुशीतच टांग मारली
गेलो बाहेर फिरायला
सायकल बघुनी अवतीभोवती
मित्र माझे झाले गोळा
चक्कर मारण्यास एक एक
सायकल दे तू आम्हाला
विसर नाहीतर आजपासुनी
आपल्या तू रे मैत्रीला
सुचले नाही काही मला
अन् सायकल दिली खेळायला
चक्कर झाली एक एक नि
खिळखिळी केले त्यांनी तिला
घरी जाता सांगू काय मी
आता आईबाबांना
अन् मित्रांसाठी काय पण!
बोलून टाकले मी त्यांना
