STORYMIRROR

Vimal Patkari

Abstract Classics Children

4  

Vimal Patkari

Abstract Classics Children

पेशाभिमान रियल हिरोंचा

पेशाभिमान रियल हिरोंचा

1 min
281

चला चला सवंगड्यांनो

जावू चला खेळाया

खेळतांना आवडीचा  

आपला पेशा सांगू चला !!


शिक्षक मी होणार

छोट्या छोट्या मुलांना शिकवणार 

शिकवतांना बालमनांवर

सुसंस्कार मी करणार !!


महाविद्यालयाचा मी

प्राध्यापक होणार

मोठ्या मोठ्या मुलांना

मी अदबीनं शिकवणार !!


डॉक्टर मी होणार

आजार्याला तपासणार 

आजाराचे निदान करुनी

औषध गोळ्या मी देणार !!


इंजिनिअर मी होणार

घराचा नकाशा काढणार 

गगनचुंबी इमारतिंचा  

पाया भक्कम बांधणार !!


न्यायाधीश मी होणार 

अन कोर्टाला जाणार

न्यायदेवतेला स्मरुनी

खरा खरा न्याय मी देणार !!


सैनिक मी होणार 

देशाचे रक्षण करणार

शत्रुशी झुंजतांना 

प्राणाची पर्वा ना करणार !!


शेतकरी मी होणार

शेतात राब राब राबणार 

धनधान्य पिकवुनि

देश हा समृद्ध करणार !! 


भारतमाता : - शाब्बास , शाब्बास ,शाब्बास

माझ्या सुपुत्रांनो

नितीनं असंच वागा

मान माझी ताठ ठेवा

नितीनं असंच वागा 

आपला पेशाभिमान राखा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract