आठवण
आठवण
तुम्ही दिलेले ते प्रेम ,
डोक्यावर हात ठेवून दिलेला आशिर्वाद,
भूतकाळातील हे क्षण आठवले की,
मन बहरून जाते,
पण,
मग मनात विचार येतो की,ते क्षण आठवायला तुमच्या जवळ वेळच कुठं आहे?
ताई सोबतच्या मस्त्या ,आमच्या त्या खोड्या,
लपून लपून खाल्लेला खाऊ,
आजही ते क्षण आठवले की डोळे भरून येतात,
पण,
मग मनात विचार येतो की डोळे भरून येण्या इतका तुमच्याजवळ वेळच कुठे आहे?
दादाचे ते ताईला चिडवणे, ताईचे ते चिडणे,
मला मध्येच न्यायाधीश बनविणे,
आजही ते क्षण आठवले की तुम्हाला भेटावेसे वाटते,
पण,
मग मनात विचार येतो की आम्हाला भेटण्या इतका तुमच्याजवळ वेळच कुठे आहे?
त्या क्षणांचा हिशोब मी आजही घेत राहते,
पण,
मग मनात विचार येतो की त्या क्षणांच्या
हिशोबाची गोळाबेरीज करण्या इतका तुमच्याजवळ वेळच कुठे आहे?
