STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Children Stories Inspirational

4  

Swarupa Kulkarni

Children Stories Inspirational

सुपर हिरो बाबा

सुपर हिरो बाबा

1 min
319

बाबा असतो मुलांचा आवडता सुपर हिरो न्यारा,

जीवनभर जगतो फक्त मुलांसाठीच खरा...


तो आणि मुले दंगा करतात घरी खूप,

आई म्हणते बाबाला बस झाली धुडगूस...


बाबा रंगात आला की कॅरमही आवडतो खूप,

कारमध्ये फिरवतांना हसवतो भरपूर..


बाबाला नी मला आवडते पाणीपुरी भारी,

तो वळवतो गाडी तिकडे नी मजा येते खरी...


त्याला असते नेहमी काम ऑफिसचे जास्त,

पण म्हणून नाही चुकवली कधी रात्रीची गोष्ट...


त्याला आवडतात गाणी नी पिक्चर जुने नवे,

मीही ऐकत रहातो लता रफीचे तराणे....


तो किती जगतो भरभरून आमच्यासोबत,

मजा येते त्याच्या गप्पात सगळं वाटतं सोप्पं...


तो कितीही मोठा वयाने पण मारत नाही कधिही,

म्हणून पिल्लं आम्ही त्याला मानतो नेहमी...


त्याची नी आमची नाळ बाप लेकरांची,

जणू बाबा भासतो मला देवाचाच दूत भारी.


Rate this content
Log in