पाऊस
पाऊस
1 min
266
का असा थबकतोस
पुन्हा पुन्हा जाताना
अश्रू ओघळतात का
मागे वळून पाहताना
दमला असशील तू ही
अहोरात्र पडताना
बरं वाटतं का रे असं
सगळ्यांच्या शिव्या शाप खाताना
तू ना माझ्याबरोबर
असा का खेळतोस
मी बाहेर पडताच
मला पकडायला येतोस
तू आलास की कसं सगळं
स्वच्छ, लख्ख होत
पण माणसाचं मन मात्र
किती गढूळ राहत
एरवी मी सर्वांपासून
माझे दुःख लपवतो
तू आलास की मात्र
तुझ्या गळ्यात पडून रडतो
कितीदा आपण असे
एकांतात असतो
आणि तू माझ्या हृदयाची
सहज तार छेडतो
बेभान वारा, बेधुंद गारवा
मिट्ट अंधार दाटला
सौदामिनी चकाकते नभी
अखंड बरसात सागरात साठला
