बालपण
बालपण
1 min
373
तेव्हाचे दिवस होते असे
जसे क्षणात पळावे ससे
रोज मीठ भाकरी सुद्धा
पंचपक्वान्न आम्हा भासे
मजा होती किती मोठी
उडवितांना चिखलमाती
पावसाचे ते थेंब थेंबाने
यथेच्छ येती जिभेवरती
खेळ पळापळी करतांना
सदा धडपडले दगडावर
अनेकदा झाल्या जखमा
माझ्या दोन्ही गुडघ्यांवर
चढलो खूप झाडावर
टोचलेत काटे खुपदा
लपवित ते आईपासून
मार खाल्ला अनेकदा
अल्लड होते सारे काही
भासती स्वप्नवत पारवे
आठवताच ते दिवस
येते मनात हळूच हसे
पाडतांना आंबे चिंचा
दगड जाई भलतीकडे
भलतीच जिद्द होती
ऐकत आईचे ओरडे
