STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Inspirational Children

4  

Rohit Khamkar

Classics Inspirational Children

बोबडी तुझी वाणी

बोबडी तुझी वाणी

1 min
317

पुन्हा नव्याने साजरं सारं, डोळ्या आले पानी

मुलगी आली घरी, बोबडे बोबडे बोल तूझे बोबडी तुझी वाणी

आता थोडी मोठी झालीय, रडते गोड गाणी

बाप झाला श्रोता, आवड लावली कोनी

सगळं काय ते ठेंगणं, आकाश पाताळ दोनी

मुलगी आली घरी, बोबडे बोबडे बोल तूझे बोबडी तुझी वाणी

आधीही चालायचो खुप, पाय थकायचे दोन्ही

कामाच्या बाबतीत वाटायचं, काय झाली गोनी

रूपडं तूझ रखुमाई, साज घातला खणी

मुलगी आली घरी, बोबडे बोबडे बोल तूझे बोबडी तुझी वाणी

तूझ्या सवे खेळताना, जाणवत नाही ग्लानी.

शुध्द झाले अंतःकरण, आनंद आहे वचनी.

पुन्हा आले फिरुनी बालपण, मुद्दा नाही पचनी.

मुलगी आली घरी, बोबडे बोबडे बोल तूझे बोबडी तुझी वाणी

सगळं सोपं वाटतंय, कसलीच भिती नाही मनी

हलकासा हुंकार ही आता, ऐकू येतो या कानी

गोष्ट झालो मी, तूच राजा अनं तूच माझी राणी

मुलगी आली घरी, बोबडे बोबडे बोल तूझे बोबडी तुझी वाणी

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics