Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vaishali vartak

Fantasy Children

4  

vaishali vartak

Fantasy Children

बाल साहित्य हत्ती

बाल साहित्य हत्ती

1 min
305


विचारात रस्त्याने ,चालत होता हत्ती 

 का बरे इतर प्राणी, नसती अवजड   

माझेच शरीर अवाढव्य किती  ?

तयांचे बांधे, कसे नाही बोजड       1 


पोट तर माझे , जणू कोठार घर

पंधरा वीस लाडू , सहज होती फस्त 

केळ्यांच्या घड तर , एकची घासात

बादली भरुनी पाणी , पितो मी मस्त   2   


असा हा आहार , असताची माझा

 कसे कमी होणार, सांगा हे शरीर

तरी करतोय सदा, विचार मी मनात

उगा नको व्हायला, कदा तो उरीर      3 


मानव करतात , रोजची व्यायाम

देऊन शरीरास , शिस्तीत तालीम

सुडौल सृदृढ , राखण्या बांधा

उपाय करतात, अनेक जालीम       4


डाॕक्टरांना विचारण्या, गेला हत्ती 

दिले औषध तया , बादली  भरुनी

बांध्याची चिंता , नका करु म्हणताच

सोंड घातली हत्ती ने , घाई करुनी      5


अरे रामा s रामा , किती कडू औषध

म्हणत असे हत्ती, पळतच सुटला

नकोची मला तो , सुडौल बांधा 

तेव्हापासून हत्ती , जाड्याच राहिला.   6



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy