छकुली
छकुली
इवली, इवली छकुली
रंग गोरापान
गुबगुबीत गाल तिचे
दिसते फार छान
इवली, इवली छकुली
खूप खूप नकली
झोपेत ती खुदकन
गोड हसली
सुंदर तिचे नाक
श्वास घेते झाक
बालपणी शिकवण
वासाचीअसे जाण
इवले, इवले कान
ऐकते खूप छान
आईच्या आवाजाने
वळविते मान
इवले इवले डोळे
फिरे गरागरा
सगळे गेले मोहून
पडे सगळ्यांच्या नजरा
रंग गोरापान
सौंदर्याची खाण,
गालावरची खळी
दिसते खूप छान
इवले, इवले पाय
करते कदम ताल
डावा उजवा,डावा उजवा
करते हालचाल
अशी सुंदर सोनुली
माझी छत्र साउली
तिच्या संगे जाई वेळ
आयुष्यभर माझी माऊली