STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

संसाराचे मर्म

संसाराचे मर्म

1 min
217

मर्म सुखी संसाराचे

जाण खरे मनी बाळे

सुखी रहा तू संसारी

मने नीट सांभाळ गे!!  (1)


उपदेश दिला कोणी

प्रत्येकाला मान द्यावा

नको देऊ प्रत्युत्तर

मनी संयमचि हवा   (2)


नवखीच तू नवरी 

अनुभव ना पदरी

कला माणसे जोडणे

शब्द जपून वापरी    (3)


रथ संसाराचा नीट

दोघे प्रेमाने चालवा

गुंजारव प्रेमभरे

हर्ष द्विगुणित व्हावा   (4)


मर्म पूर्ण ओळखूनी

गोफ नात्यांचे गुंफावे

माया प्रेम स्नेहभरे

नाव जगी मिळवावे   (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract