मी बळीराजा बोलतोय
मी बळीराजा बोलतोय
कधी येते भुरभूर
कधी कोसळे वर्षाव
कसे राखावे हे शेत
मला उमजेना ठावं
नसे ट्रॅक्टर सेवेला
करी गडी नांगरणी
नाना लहरी तयांच्या
मीच लीलया सांभाळी
शेती उत्तम म्हणती
नित्य सारेच वदती
ढग पावसाचे नित्य
हूल देऊनी पळती
कच्चीबच्ची दोन माझी
पत्नी नेहमी आनंदी
दुष्काळाच्या झळेपायी
मन झाकोळून जाई
कर्जमाफीसाठी चाले
डाव राजकारण्यांचे
आत्महत्या शेतकरी
वैतागून करतसे
येरे येरे बा पावसा
हव्या त्या वेळेतच
येई हवा तेवढाच
विनवणी तुजलाच
