हिरवा निसर्ग
हिरवा निसर्ग
देई आनंद नकळत मना
भरभरून हिरवा निसर्ग |
खळाळत्या पाण्याचा जसा
धरणातून व्हावा विसर्ग | |१| |
वृक्ष पान वेली पाखरं फुलं
उधळती तऱ्हेतऱ्हेचे रंग |
निर्मळ गाणे गातो निर्झर
तृप्त करूनी पाखरां संग | |२| |
प्रसन्नता, समाधान देई दरवळ
सुगंधी फुलांचा सदा मनाला |
झुळूक स्पर्शता मंद वाऱ्याची
खुलवीत राही हर एक तनाला | |३| |
सृष्टी सौंदर्याने परीपूर्ण नटलेला
हिरवा निसर्ग मानवाला वरदान |
निसर्गावीन जगणेच रटाळवाणे
मानवा ठेव सांभाळूनी दैवी दान | |४| |
