धोका
धोका
तुझा धोका खाल्लेले
मला कित्येक भेटले होते,
तरीही म्हणतात...
आठवण तुझीच येते..
कुणाकुणाला लावायचा जीव
बरं झालं तू विसरून गेलीस,
तुझा नामाचा जे करती जप
त्यांना चांगलीच तू पावन झालीस.
भाळले सर्व तुझ्यावर
तुला न ओळखले कोणी,
तुझ़्यावर भरोसा होता
तू गेलीस वाट लावूनी.
तरीही झुरतात सारे
सतावते तुझी आठवण,
तुला लावला ज्यांनी जीव
त्यांना दिले तू मरण.
बरबाद झाले सारे
तू केलीस बरबादी त्यांची,
त्यांचा गुन्हा काय होता?
ती जादू तुझ्या रुपाची.
तुला सवयच आहे
रोज धोका देण्याची,
प्रेम तुझ्यावर करणाऱ्यांची
वाट अशी लावण्याची.
प्रेम नाही कळले तुला
तुझा तो आहे खेळ,
जे जे लागले नादी तुझ्या
तू केलीस त्यांचं वाटोळं.
