गुज अंतरीचे
गुज अंतरीचे
कसे कळावे तुला माझ्या
अंतरीचे गुज ते प्रिया |
तुला पहाताच विसरून
जाते साऱ्याच क्रिया | |१| |
लागले रे वेड मजला
तुला भेटण्याचे |
बहाणे ते तुझ्यासाठी
फुले वेचण्याचे | |२| |
सदा स्वप्नांतही मी सख्या
तुलाच का रे पाहते? |
जागेपणी तु न दिसता
तुझ्याच विचारांत राहते | |३| |
समजून का न घेशी तरीही
हे तु गुज माझ्या अंतरीचे |
सांगू कुणा व्यथा मी सहाय्य
मागू आता कुणा धन्वंतरीचे | |४| |