खेळ सावल्यांचा.
खेळ सावल्यांचा.
ढीग भरला असांकेतिक सिध्दांतांचा,
पांढरा पडला तो रंग फळ्याचा,
नियम मोडला आम्ही न्युटनच्या वेगेचा,
तेव्हा सुरू झाला खेळ सावल्यांचा.
अभ्यास केला आम्ही विविध सुत्रांचा,
संपुर्ण आकार-उकार बदलला चिन्हांचा,
लिहीताना नियम चुकला हायजनचा,
तेव्हा सुरू झाला खेळ सावल्यांचा.
खेळ पाहिला आम्ही भातुकलीचा,
वस्तूवर प्रकाश पडला तो सुर्याचा,
सिध्दांत बरोबर निघाला मॅक्सवेलचा,
तेव्हा सुरू झाला खेळ सावल्यांचा.
गरज नाही लागत त्याला माध्यमांचा,
दृष्टीकोण बदलला तरंगाकडे पाहण्याच्या.
वेग खुपच जास्त आहे त्या प्रकाशाचा,
तेव्हा सुरू झाला खेळ सावल्यांचा.
प्रश्न सोडवला आम्ही त्या वेगेचा,
वेळ वाचवले आम्ही अंतर कापण्याचा,
अर्ब्लट मामुने लिहीला नियम उर्जेचा,
तेव्हा सुरू झाला खेळ सावल्यांचा
अभ्यास केला मी खुप सिध्दांतांचा,
नियम चुकीचा ठरवला प्रकाशाच्या हस्तक्षेपाचा,
आणि नोबेल मिळवला मी भौतिकशास्ताचा,
तेव्हा संपला हा खेळ सावल्यांचा...
