कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
आपल्यालासुद्धा मन आहे मानायचं असतं
पतंग होऊन आपल्याच अवकाशात विहरायचं असतं
स्वप्नांवर स्वार होऊन लहरायचं असतं
कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
कर्तव्याला चुकायचं नसतं
पण मोडेल इतकं वाकायचं नसतं
मनासारखंही वागायचं असतं
कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
इतरांसाठी जगता जगता आपलं जगायचं राहून जातं
स्वतःसाठी काही मागणं मागायचं राहून जातं
आदर्श बनावं म्हणून धावायचं नसतं
कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
स्वतःसाठी जगलं कधी तर गैर का आहे!
लगेच थोडी आप्तांशी वैर होत आहे
त्यांना तसं वाटलं तर लक्ष द्यायचं नसतं
कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
मनाचं ऐकलं की लगेच स्वार्थी का होतो!
अस्तित्व आपलं मानलं तर आत्मकेंद्रित का होतो
स्वार्थी नक्की कोण ते ओळखायचं असतं
आणि म्हणूनच...
कधीतरी थोडं स्वार्थी बनायचं असतं
