आयुष्यावर बोलू काही
आयुष्यावर बोलू काही
आयुष्यावर बोलू काही
असेच आहे हे सुंदर
कितीही म्हणले तरीही खरे
राहणार नाही हे चिरंतर...
आज आहोत उद्या नाही
आहेच हे क्षणभंगूर
म्हणून तर जगावे उल्हासाने
खळखळून हसू उधळून
आशा निराशा, सुख दुःख
आहेत येथील सोबती
प्रत्येकाच्या आयुष्यात
यांची परिभाषा वेगवेगळी...
कोण जाणे, कधी काय होईल
कोणास येईल का सांगता?
म्हणून प्रत्येकाने आनंदाने जगावे
हीच मनी प्रार्थना...
