हाय काय अन नाय काय....
हाय काय अन नाय काय....
इथे कुणाला कुणाचं
पडलें नसें काहीं,
येनकेन प्रकारे जो तों
आपली सोय पाहीं...!
कळशीभर पाण्यासाठी
खुन पडतात येथे,
माणुसकीचा गहीवर
दम तोडतात तेथें....!
कुणाच्या कपाळी
कुणाचे असे कुंकू,
उजेडी आव सारें
रात्रीचे कसें पाप झाकूं..?
मर्यादांचे बांध सारें
सुधारणांनी तोडलें,
व्यक्ती स्वातंत्र्याचे पिशाच्च
बाळसें धरु लागलें...,.!
जुने सारे कालबाह्य
खुळचट म्हणे चालीरीती,
नव्या ध्येय धोरणांची
लक्तरें वेशी वरतीं...!
कायद्याचे आले राज्य
न्याय महाग झाला,
पदोपदी जाणवतों
श्रीमंतीचा बोलबाला...!
कुठलीही असो प्रणाली
माझ्या शिवबाचे राज्य नाही,
मोठे मोठे शब्द सारें
गरीबाचा वाली नाही...!
