खारुताई
खारुताई
सरसर झाडावर
चढते खारुताई,
कळेना कसली
असते तिला घाई.
खारुताईचे अंग
मुलायम फार,
पाटीवर छानसे
पट्टे ते चार.
खारुताई मारते
फार फार उडया,
पकडायला तिला
चला जाऊ गडया.
टकमक बघते
करून ऊंच मान,
ऐटीत बसते
महाराणी छान.
मला आवडतो
खारुताईचा थाट,
शेपटीचा गोंडा
बाकदार पाट.
खारुताई, खारुताई
या आमच्या घरी,
करुया आपण
धमाल खरी.
खारुताई, खारुताई
थोडे तुम्ही थांबा
कोणतं फळ आवडते
तुम्हाला ते सांगा.
खारुताई दिसता
छान, छान गडया
आम्हाला शिकवा
मारायला उड्या.
