STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational Children

3  

Shobha Wagle

Inspirational Children

गरज लैंगिक शिक्षणाची

गरज लैंगिक शिक्षणाची

1 min
268

तंत्रज्ञानावर चालले युग आजचे 

एका क्लिकवर माहिती गुगलवर

म्हणून सगळा माजलाय गोंधळ

लैंगिक शिक्षणाचा भार शिक्षकांवर


सज्ञान आहेत आजचे पालक

मुलगा मुलगी समान मानत

आई शिकवत असते मुलीस

तसे वडिलांनी मुलास जावे सांगत


शिक्षक व्हावे पालक देण्या ज्ञान

शरिरातले बदल अगोदरच सांगावे

होतील मुले सतर्क तया बाबत

अचूक ज्ञान पालकांकडून मिळावे


मुलगा मुलगी सावध होतील

अत्याचार, विकृतीला आळा बसेल

स्वयं रक्षणास असतील सक्षम

वाईट नजर मुलगा मुलगी ओळखेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational