STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Children

3  

Priti Dabade

Inspirational Children

हस्ताक्षर

हस्ताक्षर

1 min
460

हस्ताक्षर सुंदर करू या

देश उद्याचा घडवू या

संस्कृती टिकवुनी सारे

मातृभाषा जतन करू या


मोत्यासारखे टपोरे जणू

गोलाकार अन् ठळक

लक्षवेधी होई प्रतिभा

काढता हस्ताक्षर सुबक


ध्यानी भाषाशैलीचे नियम

वेलांटी उकाराचे भान

करी हस्ताक्षर सुंदर

देई समाजात उच्च स्थान


परीक्षक करी गुणदान

हस्ताक्षर दिसता छान

क्लिष्ट घाणेरडे अक्षर

नाही मिळत गुंणांचा मान


संगणक येता घरोघरी

लिखाणाचा सराव जाई

रोजच्या शुद्धलेखनाने

हस्ताक्षर सुधारणा होई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational