क्रूर नियती
क्रूर नियती
जन्मलेल्या अर्भकाला
दुर्दैवाने दृष्टी नसे
सृष्टी अगम्यच असे
नियतीचे क्रूर फासे
जन्मतःच अनाथत्व
ऊब न मिळे मायेची
रहाणे अनाथाश्रमात
क्रूर करणी नियतीची!!
पोर हरवे जत्रेत
हंबरडा फोडी माता
लावी वाममार्गाकडे
नियती न ठेवी त्राता
सुखी तरुण कुटुंब
लेकींचा किलबिलाट
कर्त्याचे हृदय बंद
नियतीचा दुर्विलास
गणगोत जमलेले
भेटीगाठी खुललेल्या
वाद्ये आतुर वाजण्या
मान्य नसे नियतीला
का अशी क्रूर नियती?
करी भल्याचा विचका
नको असे दुःख कुणा
विनविते भगवंता!!