STORYMIRROR

Swati Damle

Inspirational

4  

Swati Damle

Inspirational

' क्रान्तीसूर्य '

' क्रान्तीसूर्य '

1 min
682


' क्रान्तीसूर्य '


भारतभूचा प्रांत एक हा मानाचे पान

स्वातंत्र्याच्या इतिहासातील द्वीप 'अंदमान'

निळ्या सागरी उसळत होत्या लाटांवरी लाटा

सावरकर बंधुंच्या तेथील सांगत होत्या कथा

कोलू ओढूनी श्रमले आणि कितीक बळी पाहिले

तरी न खचले,निग्रही राहूनी 'कमला'काव्या लिहिले

असिधाराव्रत अंगिकारुनि वाण सतीचे धरिले

जीवनकमला करुनि समर्पित,धन्य जीवनी झाले

व्याख्या त्यांच्या जननाची अन् मरणाची आगळी

उपासना स्वातंत्र्यदेवीची,भक्ती जगावेगळी

तळमळ तेथे क्रांतीवीरांची,गाथा चैतन्याची

तळपत होते क्रांन्तीसूर्य ते प्रचिती तेजाची

कितीक सोशिले कष्ट,यातना परी ब्रिटिशांना पुरुनि उरले

जिद्दी,निग्रही,कणखर राहूनि पोलादा भेदले

अभिमानाने उभा आजही 'सेल्यूलर 'जेल तो

क्रान्तीफुलांच्या अमर कहाण्या,जगास जो सांगतो

क्रान्तीवीरांच्या पदस्पर्शाने पावन भू झाली

पायधूळ नच 'उटी' लावता नयने ओलावली

तीर्थक्षेत्र हे भारतीयांचे स्थंडिल धगधगते

स्मरण स्वातंत्र्यवीरांचे होता, मस्तक नत होते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational