STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Horror

2  

अमोल धों सुर्यवंशी

Horror

कंडार

कंडार

1 min
396

कंडार डोंगरवार रात्री कडकडाट उठला

गावकऱ्यांनी चावडीवर कलोह उडवला

गावभर साऱ्या दवंडी पेटवूनी

कळकीच्या बणात भुतांची घुमर घुमली

सांग्या वागीन दुर्घटना घडली 

भुतांची स्वारी गावकडे वळली

माशालीने गाव पेटून उटला

पाटलांच्या घराकडे धावत सुटला

दसर्‍याच्या सनाला देव गेलेत शिकारीला

वेशीवरील खविस परडीने भागेना

राखन करता लबाड झाला

पिंपळा खालील मारूती चोरीला गेलाय

आडावरच्या जकनीन सुमनिला धरलय

तीझ्यासाठी उपारट तलंग नाय सोडलय

या वकताला मोठा घात होणार 

भुतांचा गावत सबिना येणार

गावकऱ्यांचे हालहाल होणार

भूत पिशाच्य कोल्हा कूत्रासारखे लचके तोडणार

पाटलान मिशीला पिळीत ईशारा दिला

गावकर्‍यांचा हिवाळ्यात घाम फुटला 

पुजाराने कवल घेवून आरडा ओरडा केला

जमीन थोपटवत बोलू लागला

देवीचा कोप झालाय शापित झाला गाव सारा 

मागल्या वर्षीला बळी नाय दिला

यंदा भुतांचा सुटलाय भवंडर वाऱा

लाटला जाईल त्याखाली गाव सारा 

गावत झाली पळापळ सारे पळाले नदीवर 

पांड्या नाहवी राहीला दुकानवर कोटर मारून झोपलाय टर

जंगलात आवाज थरारला पांड्या भयंकर ओरडला

गावसारा चोरांनी चोरून नेहेला एक प्याक मारू डूलकून पडला

सकाळ प्रहारी लोकांनी घराकडे घेतला पळ

बघताच सारा हा प्रकार दचकून गेले सगळे जण

लाकडचोरांनी गलीमा केला

सारा कंडार डोंगर वाडसून नेहेला 

अंधश्रद्धे पायी लोकांना अद्दल घडली

पुन्हा त्या गावी भुतांचा जन्मच का नाही झाला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror