कळत नव्हते
कळत नव्हते
नाकारले त्यांनीच संदर्भ माझे
अर्थ संदर्भातील ज्यांना कळत नव्हते
अंत झाला अन्नाविन त्यांचा
महत्त्व मूलभूत हक्काचे ज्यांना कळत नव्हते
मिटल्या नाहीत प्रतिक्षेच्या वेदना
हृदयावरचे घाव ज्यांना जाणवत नव्हते
अग्नी देऊनी चितेला आताच परतला
प्रेमासाठी काळीज ज्यांचे कळवळले नव्हते
थकले भागले संपले सारेच आता
ओझे जीवनाचे ज्यांना पेलवत नव्हते
दगा दिला प्रेमाला ,तुटल्या तारा
निस्वार्थी प्रेम ज्यांना कळत नव्हते
गुदरमला श्वास तरणी लागले डोळे
कातडे नकली वाघाचे ज्यांना कळत नव्हते
नालंदा वानखेडे,
नागपूर
