कल्पना
कल्पना
तुझ्या नुसत्या कल्पनेने
आठवणींचे ढग साचू लागले
पाहता पहता मन माझे
पिसारा फुलवून नाचू लागले
जिथे झाली होती पहिली भेट
धरनग्रस्त तू झाला तेव्हा
शेतीच्या त्या तुकडयावर
तू मी रडलो किती तेव्हा
आठवणींचा हिशोब मांडून
किंमत त्याची कशी करावी
अंतरी जपावी सोबती ती
आणि सुख ते मनी स्मरावे
शांत त्या तळ्यात मी
सहज मारीला होता खडा
किती तरंग उठले तेव्हा
जसा तुजसाठी माझा लळा
जगण्याची ही धडपड
तळ जीवनाचा गाठण्या
आयुष्य सार गेलं असच
आली तुझ्यात रमण्या
