Manisha Awekar

Abstract


3  

Manisha Awekar

Abstract


किती त-हा वेदनांच्या

किती त-हा वेदनांच्या

1 min 157 1 min 157

वाटे सुखद वेदना

प्रसवाच्या समयाला

कठीणची सोसण्याला

उधाणची स्वानंदाला   (१)


वेदनांचे जाळे असे

दाट मानवशरीरी

खूप छळती सलती

भरे वेदनाच उरी    (२)


अपघात शरीराला

जाळे पसरी वेदना

कुणी भोग हा प्रारब्ध

चुके ना सोसण्याविना  (३)


वैद्य डॉक्टर सत्वरी

करी ह्यावरी उपाय

शस्त्रक्रिया नि औषधे

भोगणेच निरुपाय   (४)


छळे मनासी वेदना

रुप भयंकर तिचे

वरवर आलबेल

परि मनास सलते   (५)


सल खोल अंतरात

असहाय्य हो मनास

ना सांगू शके कुणा

कसे दाखवू कुणास?  (६)


शारिरीक वेदनांस

अंत तरी औषधांनी

मानसिक वेदनांसी

अंत नसतो जीवनी   (७)


Rate this content
Log in

More marathi poem from Manisha Awekar

Similar marathi poem from Abstract