STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

खरं-खरं सांग गडे ...

खरं-खरं सांग गडे ...

1 min
234

तीच पाटी, तीच लेखन, तीच शाळा

पुन्हा नव्याने गिरवशील का तेच धडे ?

मी असेल , नसेल तिथे भलेही ....

आठवशील का ग क्षण ते लोभसवाणे ?

खरं-खरं सांग गडे ...


तोच गाव ,तीच नदी ,तोच पाणवठा

धुणे धुवाया याच किनारी येशील का ?

तीच निरागसता ,तीच ओढ , जुनीच खोड

पुन्हा नव्याने काढशील का ?

खरं-खरं सांग गडे ...


रमली असशील संसारी तुझ्या ग

थकली असशील कर्तव्यपूर्तीने

दिल्या घेतल्या त्या वचनांना

आता तरी जागशील का ?

खरं-खरं सांग गडे ...


आता तुझं विश्व् वेगळं मान्य परंतु ...

विसर सारा भांडण तंटा फक्त एकदा भेट आता

खुल्या दिलाने माफ करशील हमखास तू ...

निरागस, अल्लड राधा होऊन येशील का ?

खरं-खरं सांग गडे ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational