STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Classics

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Classics

खिडकी आणि नातं

खिडकी आणि नातं

1 min
207

खिडकीशी नातं जरा

जवळचं झालं आहे..


या काळात आत राहिले

त्या जागेशी एकरूप झाले..


रोज नवीन काहीतरी शिकत

किंवा मग अशीच बसायचे..


कधी बोलणं झालं तर ठीक नाहीतर 

माझ्या सखी सोबत गप्पा मारायचे


धो धो पडणारा पावसाचे थेंब

त्या तळव्याने झेलायचे..


इंद्रधनुष्य सुद्धा त्या खिडकीतून

एकटक पाहत राहायचे..


एक कवडसा आत आला की आभाळ

ही किती कमाल दिसायचे ..


तो शांत रस्ता आणि किलबिल करणारे 

पक्षी त्यांच्या बरोबर बोलणे व्हायचे..


अशी मी एकटी एकाकी माझ्यातले 

काहीतरी शोधायचा प्रयत्न करायचे..


कधी आठवणी तरळून जायच्या तर कधी

(चहा) त्याच्या सोबत गप्पा मारायचे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama