STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

खेळ ऊन-सावल्यांचा

खेळ ऊन-सावल्यांचा

1 min
181

ऊन सावल्यांच्या हिंदोळ्यावर 

आशा निराशेचा घेते झोला 

दुःख धावते सुखापाठी 

तूच केला निर्माण पसारा


आशेचा सूर्य झाकोळण्या

निराशेचे मेघ येती हो

इवलुश्या त्या ज्योतीला

तमात ढकलून जाती हो


दिवस उगवतो छान सोनेरी

घाबरते मी अंधाराला

असे वाटते येऊन कोणी

थांबवेल का? मम श्वासाला


घुसमटतो मग श्वास ही माझा

बुडते मी त्या तम अंधारी

येतो कोणी अज्ञात हात

खेचून घेतो माझी दोरी


पुन्हा घेते मी श्वास नवा

आरंभ करते नव्या जगण्याला

झटकूनी मळभ मनावरचे

फुटती धुमारे जीवनाला

फेकीत सोनेरी नव किरणे 

रवी उभा मम स्वागताला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational