ती
ती
प्रणाम तिजला मनोमनी
ती एकाएकी उदास वाणी
तरीही गाते मंजुळ गाणी
हृदयी भरले अमृत तिचिया
डोळ्यांमधूनही वाहे पाणी
उजाड माळरानावरती
थापते ती भाकरी
जोजवीत झोळीतल्या पोरा
मद्यधुंध धन्याची चाकरी
राबराब ते शेतीमध्ये
कष्ट उपसते लेकरासाठी
दोन घास पडावे त्याच्या ओठी
म्हणून राहते ती अर्ध पोटी
ती हिरकणी धावत धावत
पळते लोकलच्या पाठी
राखते गड घर ऑफिसचा
लेकरांच्या भविष्यासाठी
ती कष्टकरी ती गृहिणी
ती अभिनेत्री ती स्वामिनी
ती विश्वाची जगत जननी
प्रणाम तिजला मनोमनी