कधी कळणार आम्हाला
कधी कळणार आम्हाला
कधी कळणार आम्हाला
कोण भडकवतो कशासाठी माथी
माणूस वगळून
कुठला धर्म नि कुठली पोथी
अन्न नको वस्त्र नको नकोच कुणाला निवारा
हवा केवळ स्वजातीचा खोटा दुराभिमानाचा सहारा
जात जाता जात नाही
जातीसाठी कोण माती खात नाही
सवयीनुसार जो तो आपली
जात दाखवतोच आहे
किड्या मुंगयागत मरून का कुणी शहीद होत?
दानवांच कुणी का शौर्य गीत गात?
आरे भाऊ भावाचं कधीच वैरी नसतो
काटा याला टोचला तर आपसूकच तो गहिवरतो
कुठवर जगणार जीवन हे सैराट
अजूनही वाटणारच का दंगलीचीच खैरात
काय साधणार तुम्ही यातून रक्तरंजीत क्रांती
बस्स झाली आता व्यर्थ भ्रमंती
ते लाख पेरतील जागोजागी माथेफिरू
आपण मात्र सर्वंकष क्रांतीची बीजेच पेरू
ते लाख आखतील योजना करण्या रक्ताची होळी
आपण मात्र न्याय क्षमा शांतीची मशाल हाती घेउ
कधी कळणार आम्हाला त्यांची कट कारस्थाने
त्यांच्या स्वार्थासाठी आपण बळीचा बकरा होणे
आरे माणूस, आपण माणसा सारखं वागू
ईश्वराला आता सुसह्य जगण्याचच वरदान मागू
