जय भवानी
जय भवानी
जय भवानी आमुचा
नारा घुमतोय आता
शिवबाचे नाव येथे
खूप गाजतेय आता
झाली माझ्या शिवबाची
जयंतीची ही तयारी
फडकतो बघा झेंडा
उंच आकाशात भारी
चंद्रकोर माझ्या भाळी
बघा उठून दिसते
नाव माझ्या शिवबाचे
हृदयात या गर्जते
ढोल ताश्यांचा आवाज
सोबतीने घुमतोय
जय जय शिवराय
मोठी गर्जना होतेय
शिवबाचा मी मावळा
मला आहे अभिमान
शिवबाच्या शुरतेचे
गातो आज गुणगान