जिंकुन ऐकटा आहे ...
जिंकुन ऐकटा आहे ...
एकट्या मनाची कशी ही काहिली ,
चंद्र मिठीत घेता दिवस उगवतो आहे ,
अपुर्ण मी अपुर्ण तू कधीही ना भेटणारे,
प्रेमात जाळणारा वणवा मनाचा आहे ...
का? समजून उमजून होत नाही हे प्रेम,
किती रिती जगाच्या अन् पहरा युगाचा आहे,
तरी निसटून जाते झुगारून बंधने हे ,
कुठे पर्वा कुणाची याला दुःखाची वाट आहे...
डोळेच पापी जुल्मी हरपून भान कसे ते,
चोरून मन कुणाचे घायाळ करते आहे ,
ताबा ना कुणाचा यावर विश्वासही कसा ठेवावा ,
फितुर वेळोवेळी फसलेला डाव आहे ...
उंबरठा ना याच्या घराला ओलांडेल कसा ,
बेभान सर पावसाची झेप उंच आकाशात आहे ,
कधी ऐकटे रमतांना आठवणी स्पंदनात घेऊन,
ऐकटाच साऱ्या जगाशी , जिकूंन एकटा आहे...

