जीवनगाथा
जीवनगाथा
स्वप्न जगाचे स्वप्नातील जग
किती असंख्य जीवनगाथा
पूर्ण अपूर्ण तुटतात काही
त्यासमोर कधी नमतो माथा
धुक्यासम कधी जीवन भासते
अबोल कधी हे शब्द बोलते
आहे कुठे झाले दिसेनासे
रस्ते ही कधी हे भिरभीरते
शोध घेता समस्यांचा
जीवन हे संपून जाईल
अंतरीक कधी डोकविता
जीवन नव्याने फुलून येईल
नवजीवन हे तुझ्यात आहे
तुझाच तु असे आरसा
जगात कधी ह्या हरवू नको
मनाशी तुझ्या दे तूच दिलासा