जागरूक कुटुंब
जागरूक कुटुंब
1 min
29
रक्त नाते गोते संख्या
मिळून यांचे कुटुंब होत नसते
आदर मानसन्मान जिथे
प्रेम काळजी साथ हेच खरे असते
असावे असे कोणतेही
नित्यनियमांचे जागरूक कुटुंब
दुःखाला तिथे नसावा थारा
सुख नांदते जिथे तुडुंब
जगाच्या एका कोपऱ्यात
प्रत्येकाचे असते कुटुंब एक
पशु प्राण्यासम जिवन नसावे
एकमेकांप्रति ते असावे नेक
चंद्र तारे आकाश धरती
पसरले सर्व या सृष्टीवरती
जीव किती ते किती जमाती
सौख्याने राहू सर्वांप्रती