STORYMIRROR

Sudha Patil

Inspirational

3  

Sudha Patil

Inspirational

माणूस

माणूस

1 min
163

साऱ्यांचाच जन्म

आईच्या गर्भातून होतो

नऊ महिने नऊ दिवस

माणसाला तयार व्हायला लागतो


देहाला अवयव साऱ्यांच्या

सारखेच असतात

तरीही मानसांमानसांत

का बर भेद दिसतात


निसर्गात रंग विविध असले तरीही

सारेच सुंदर आणि मोहक असतात

आपापल्या अस्थित्वाने सारेच

फुललेले असतात


पृथ्वीवरील उपवनात

सारीच तिची लेकरं असतात

तिच्या मनात कधीच कसले

भेदभाव नसतात


धर्म, जाती पाश सारे

अर्थहीन हे खेळ असतात

निसर्गात मानवाला कसलेच

वेगळे भेद नसतात


तु ही माणूस...मीही माणूस

हीच साऱ्यांची खरी ओळख आहे

 मनात तुझ्या जात असली तरीही

तु आणि मी माणूसच आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational