STORYMIRROR

Sudha Patil

Others

4  

Sudha Patil

Others

दुर्मिळ भेट

दुर्मिळ भेट

1 min
282

निसर्गाने बाईच्या जातीला

दुर्मिळ भेट दिली.

त्यामुळेच मानवजात 

तिच्या कुशीत अंकुरली.


एका बाईची पाळी

किती अनमोल ठरली.

ती आहे म्हणून तर

मानव जात जन्मली.


नवनिर्माण करणारी पाळी

वाईट कधीच नसते.

तिच्यामुळेच तर तुमचं रुप

जगी या अवतरते.


बाळाच्या पोषणासाठीचं ते

सर्वात शुद्ध रक्त असतं.

नसते गरज जेव्हा

तेव्हा ते बाहेर जातं.


इतकं साधं आणि सरळ

विज्ञान ते असतं.

म्हणूनच त्यास कधी 

विटाळ मानायचं नसतं.


ती नसेल तर 

मानव जन्म घेईल का?

तिच्याशिवाय पृथ्वीला 

सौंदर्य प्राप्त होईल का?


म्हणूनच अज्ञानातून जरा

बाहेर पडूया

बाईची पाळी आतातरी

समजून घेऊया.


तीची पाळी एक

अनमोल देणगी आहे.

तीची ती सखी तिच्यासाठी 

मातृत्वाची चाहूल आहे.


म्हणूनच तीला कधी

अपमानीत करायचं नसतं.

तीला शास्त्रीय रित्या समजून

जपायचं असतं.


Rate this content
Log in