STORYMIRROR

Sudha Patil

Children

3  

Sudha Patil

Children

कविता....सुट्टीची मजा

कविता....सुट्टीची मजा

1 min
269

आमचा काळ लयीच भारी होता

फांदी फांदीवर आनंद उड्या मारत होता...

झाडाझाडावर माकडांचा

तळ होता...

दंगामस्तीत सारा गाव दंग होता.


भीती पडण्याची मनात नव्हती.

उंच उंच चढण्याची ईर्षा एकमेकांमध्ये होती.

कैऱ्या पाडण्याची धडपढ होती.

उन्हाळ्याची सुट्टी जणू

मेजवानीच होती.


झाडालाही आमचा सहवास

खूप आवडायचा...

आम्ही त्याच्यावर नाचलो तरीही

तो नाहीच दमायचा.


आज सारी झाडं ओस पडली

लेकर सारी मोबाईल मध्ये बुडाली.

गावाबाहेरचा तो वृक्ष आज

हिरमुसला आहे

चिमुरडी हरवली म्हणून

ढसाढसा रडतो आहे.


अशी कशी ही उन्हाळ्याची सुट्टी

आनंद हरवून बसली.

मुक्तपणे बागडायचं असतं हेच

आजची पिढी विसरून गेली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children