STORYMIRROR

Sudha Patil

Inspirational

3  

Sudha Patil

Inspirational

हंड्यावर हंडे...

हंड्यावर हंडे...

1 min
358

मर्यादांचे हंड्यावर हंडे घेऊनी

तिचा प्रवास सुरुच आहे

चालताना हंडे न पाडण्याचं

बंधन केवळ का तिलाच आहे?


आवरणं बदलत गेली

पण तिचे हंडे वाहणं सुरुच आहे

माणूस म्हणून तिचा अधिकार मात्र

कायमचाच का हरवला आहे?


शिक्षणाची शिदोरी घेऊन

घराबाहेर ती आली आहे

पण हंड्यांच ओझं मात्र

अजूनही तिच्याच का डोक्यावर आहे?


कर्तव्याचे हंडे सारे

जणू तिचंच ओझं आहे

ओझ्याखाली बिचारी आपलं

अस्थित्वच हरवून का बसली आहे?


का आणि कोणी दिल हे ओझं?

याच प्रश्नात ती अडकली आहे

फेकून द्यावेत सारे हंडे म्हणून

ती सतत का धडपडत आहे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational