एकदा पावसात भिजून बघ
एकदा पावसात भिजून बघ
एकदा पावसात भिजून बघ
मनसोक्त त्याला लपेटून बघ.
पाऊस कोसळतो धरावर
आठवणी तरंगतात मनावर
तो मोरपिसी क्षण पुन्हा आठवून
रोमांच उभारतो तनावर
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ....
दूरवर त्या डोंगरावर पाऊस कोसळतो
क्षितिजावर आनंदाने उधळतो
अन् धरतीला प्रेमामृत पाजतो
मग धुंदीत प्रेमाच्या धरती
हिरवा शालू लेसते अन्..
आकाशाशी जणू एकरुप होते.
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ...
पाऊस असतोच आबालवृद्धांना सुखावणारा
प्रेमवीरांना चिंबचिंब भिजविणारा
पक्षांना पंखावर पाऊस घेऊन
आनंदाने घिरट्या घायला लावणारा
अन् मोराला धुंदीत नाचायला लावणारा
मानवी मनाला भिजवून शांत करणारा
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ..
तो कोसळतो धुंद होऊन
अन् जातो सृष्टीला चैतन्य देऊन
तुझं,माझं,साऱ्यांच गुपीत ओलंचिंब करून...
म्हणूनच एकदा पावसात भिजून बघ...
मनसोक्त त्याला लपेटून बघ...
