STORYMIRROR

Sudha Patil

Others Children

4  

Sudha Patil

Others Children

चल सखे....

चल सखे....

1 min
227

चल सखे थोडं बालपणात फिरून येऊ

चिंताविरहित जीवनाचा पुन्हा आस्वाद घेऊ.


परकरपोलक, दोन वेण्या आणि खिशात 

खाऊची पुडी घेऊन गावभर भटकून येऊ

चोरून आंबे अन् चिंचा धावत जाऊ

मिठाच्या ढिगासोबत डोळे मिचकावत खाऊ...

चल सखे थोडं बालपणात फिरून येऊ


लगोरी,जिबली, लपंडाव,लंगडी,खड्यांचा डाव

हे सारे खेळ पुन्हा आपण खेळू

भांडभांड भांडलो तरी पुन्हा एक होऊ

नागपंचमीचा पाऊस झेलत झोका खेळू

झोका उंच उंच जाता आनंदाने उड्या मारू

चिखलात बेभान होऊन नाचू

चल सखे थोडं बालपणात फिरून येऊ


ना अभ्यासाची चिंता,ना करिअरच ओझं

आपणच आपल्या मनाचं राजं

आज तिच्या घरी लग्न तर उद्या

हिच्या घरी पूजा तर परवा

कोणाच्या घरी बारसं...

रोजचं नुसती मज्जा करू

चल सखे थोडं बालपणात फिरून येऊ


तो काळ खरंच किती छान होता

रिकाम्या वेळेचा सुकाळच होता

वाऱ्यासारखं फिरणं अन् अदाशासारखं खाणं

यातच दिवस जात होता.

मैत्रिणींसोबत गप्पा मारायला वेळच पुरत नव्हता.

आज खरंच ते सारं आठवतंय.

म्हणूनच म्हणते....

चल सखे थोडं बालपणात फिरून येऊ...

पुन्हा खोटं खोटं ते दिवस जगून घेऊ.


Rate this content
Log in