STORYMIRROR

Sudha Patil

Others

3  

Sudha Patil

Others

मर्यादांच्या अंगणात

मर्यादांच्या अंगणात

1 min
203

मर्यादांच्या अंगणात

आम्हीच का फुलायचं?

स्वच्छंदी फुलफाखरांपरि

कधी नाहीच का जगायचं?


विशाल त्या नभात आम्ही

कधी नाहीच का उडायचं?

पंख असुनही बळकट

नेहमी दुबळंच का बनायचं?


रुढी परंपरांच्या चाकोरीत

किती आम्ही अडकून पडायचं?

सारखं अबला अबला म्हणून

का बरं हिणवून घ्यायचं?


मनातल्या असंख्य प्रश्नांना

नेहमीच का दबवायचं?

आयुष्य माझे असूनही

ते इतरांच्या मर्जीनेच का जगायचं?


झाले अति सारे तर

शृंखला या तुटतील

मर्यादांचे अंगण सोडून

आकाश कवेत घेतील.


Rate this content
Log in