STORYMIRROR

Sudha Patil

Tragedy

3  

Sudha Patil

Tragedy

तुझं अचानक जाणं..

तुझं अचानक जाणं..

1 min
211

मनाला सुकवून गेलं.

जीवनातील आनंदाला

जणू संपवून गेलं.

सांग आता कशी जगू मी?

आई कुणा म्हणू मी.....


क्षण तो भयानक आजही

मनाचा थरकाप उडवतो.

डोळ्यांना आपसूकच

आसवांचा पूर येतो.

सांग आता आसवांना कशी थांबवू मी?

आई कुणा म्हणू मी....


क्षणाक्षणात माझ्या आई

तुझीच आठवण आहे.

रोमारोमांत माझ्या आई

तुझीच संस्कार सरिता वाहे

सांग आता ते संस्कार शोधू कुठे मी?

आई कुणा म्हणू मी.....


आनंदाचा प्रत्येक दिन माझा

तुलाच शोधत राहतो.

सारेन शून्य भासून

मनाचा कोपरा पोकळंच वाटतो.

सांग आता ही पोकळी कशी भरुन काढू मी?

आई कुणा म्हणू मी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy