STORYMIRROR

Sudha Patil

Tragedy

3  

Sudha Patil

Tragedy

खडा सवाल

खडा सवाल

1 min
228

हे विश्र्व विधात्या 

का असा तू निष्ठूर होतोस?

सारी तुझीच लेकरे असूनही

काहींचं नशीब कोरचं ठेवतोस?


किती लाचारी, किती ती दीनता

रस्त्यावर कित्येक जीव भूक भूक करतात.

तृष्णा शमवण्या कित्येक जीव

आपलेच अश्रू पितात.


वणवण भटकूनी हे जीव

पोटाची आग भागवतात.

गरीबीला पदरात घेऊन

आयुष्य ढकलत राहतात.


दयनीय अवस्था त्यांची

मानवी मनाला घायाळ करते.

मानवा मानवात का हा भेद

याच प्रश्नात अडकून पडते.


तुझ्या दुनियेत आता ईश्वरा

जीवांची घालमेल संपावी.

दोन घासांची तृप्ती

सर्वांना मिळावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy