सरदार वल्लभाई पटेल स्मारक...!
सरदार वल्लभाई पटेल स्मारक...!
स जकतेची कणखर लोह विभूती
र ग एकतेची अंगी घेऊन जगली
दा रोदारी एकते साठी फिरता
र सयुक्त अखंड भारताची छबी उदया आली
व तनांची हातमिळवणी करुनी
ल लकारी समानतेची वाजवली
भा ईचाराची आगळीक करता
इ मानाची खोड चांगली मोडली
प त राखूनी जीवनी प्रत्येकाची
टे न्शन मुक्त भारतमाता झाली
ल वून मानाचा मुजरा करण्यासाठी
स्मा रकाची कल्पना साकारली
र मणीय अशा नर्मदा तिरी
क र जोडण्या वल्लभाई पटेलांची
भव्य स्मारकमूर्ती अवतरली....!