STORYMIRROR

Sailee Rane

Inspirational

5.0  

Sailee Rane

Inspirational

झेप तिच्या कर्तृत्वाची

झेप तिच्या कर्तृत्वाची

1 min
1.0K


होतीस सांभाळत चूल नि मूल

आणि काढत होतीस उष्टीखरकटी

तिला न पडायची कशाची भूल

जीवनात नव्हती कशातच बळकटी


कुंपणाबाहेर पडणे तिला जमतच नव्हते

आपलं अस्तित्त्व शोधणं तुला पटत नव्हते

संसाराच्या गाड्याला तिने स्वतःला जुंपल होतं

त्याच्याशिवाय दुसरं काही तिला सुचत नव्हतं


माणूस म्हणून जगायचं हे तिला ठाव नव्हतं

घराबाहेरही आहे जग हे तिच्या मनी नव्हतं

जगत होती हे दुष्कर जगणं मान मोडून

आयुष्यच नव्हतं तीच जणू संसार सोडून


या सगळ्यात जागवला आशेचा किरण

सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली

ज्योत तेजस्वी करून ज्ञानाची मशाल पेटली

स्त्री मुक्तीला तिथूनच सुरुवात जाहली


शिक्षण घेऊन सुशिक्षित ,ज्ञानी जाहली

प्रगती करून स्वतःची ,आकाशीझेप घेतली

नाना क्षेत्र पादाक्रांत करून प्रगती केली

आणि आता पुरुषांच्या बरोबरीने उभी राहिली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational