हवाहवासा पाऊस
हवाहवासा पाऊस
वरुणराजा प्रसन्न झाला , अगदी अवनीवरी
सरसरत्या धारा बरसती , वसुंधरेवरी (1)
तप्त धरित्री तृप्त जाहली , सरसर धारांनी
अलंकार नि हिरवी वस्त्रे अंगावरी लेऊनी (2)
कायापालट अवंतीचा , मनास अती लुभवी
चमत्कार निसर्गाचा , ऋतुचक्रामधुनी (3)
थंडगार शीतल पवन , झुळकीने सुखवी
इंद्रधनूची कमान चढते , रश्मीकिरणांमधुनी (4)
वेळेवरी पाऊस आला , सुखवी सर्वांसी
कृषीवल झाले हर्षित सारे , आज मनीमानसी (5)
तरुणाईचा जोष अहाहा , मोकाटच सुटती
धबधबे वाहती खळखळ , अफाट त्यांची गती (6)
मोदे बरसत तृप्त करी ,
नित-नूत पालविनी
हवाहवासा वाटे सर्वां , पाऊस मनापासूनी (7)