हरवले गड किल्ले
हरवले गड किल्ले
माफ करा
असं म्हणाल की,
आमचं चुक झाली असं बोललं की
खरंच माफ करता येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
त्या पवित्र भुमिंच पावित्र्य
खरंच राखता येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
परत जाताना तेच मनात
न येण्या पासून रोखता येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
झालेलं सगळं पुसून परत
पहिल्या सारखं करता येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
अजांतेपणे हे घडलं असं
सांगताना तोंड तरी दाखवता येतं..
म
ाफ करा
असं म्हणाल की,
झालेलं साऱ्यांना सगळं सहज
विसरता तरी येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
परत असं होणार नाही याची खरंच
काळजी घेऊ असं सांगता येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
खरचं मोठ मन करून जाणून भूजून
ते मनातून काढून टाकता येतं ..
माफ करा
असं म्हणाल की,
तो ती अमुक म्हणून मनात
नसता सोडून देता येतं..
माफ करा
असं म्हणाल की,
खरचं आपण उद्याचे भविष्य
असं थाट मनाने सांगता येतं..