हिंमत आम्हात जग जिंकण्याची
हिंमत आम्हात जग जिंकण्याची
जग म्हणायचं कोमल, नाजूक...
उंबरठ्याबाहेरच जग तिला कस पेलायचं?
जिजाऊंच्या लेकी आम्ही
झाशीच्या राणीचा आदर्श आमचा
उंबरठ्याआतलं आणि बाहेरच जग आमच्याशिवायच कसं चालायचं
मनगटात बळ आमच्या संकटाला पेलायचं
हसत हसत अश्रूंनाही झेलायचं
ओळख नाही हार या शब्दाची
कणखर बनून हिंमत आम्हांत
सारं जग जिंकायची
